नविन बांधकाम परवानगी मिळण्यासाठी प्रक्रिया काय आहे ?

/नविन बांधकाम परवानगी मिळण्यासाठी प्रक्रिया काय आहे ?

नविन बांधकाम परवानगी मिळण्यासाठी प्रक्रिया काय आहे ?

लायसेन्स आर्किटेक्ट/ला.इंजिनिअर यांनी प्री-डीसीआर करणे.

 • प्री-डीसीआर पूर्ण झाल्यावर ऑनलाईन पध्दतीने प्रकरण दाखल करणे.
 • प्रकरण ऑनलाईन पध्दतीने दाखल केल्यावर स्क्रुटीनी चलन बांधकाम विकास विभाग पुणे महानगरपालिका येथून प्राप्त करून भरणा करणे.
 • मूळ प्रकरण हार्डकॉपी स्वरूपात बांधकाम विकास विभाग येथे चलन सहित दाखल करणे.
 • हार्डकॉपी फाईलची तपासणी संबंधित विभागाचे इमारत निरिक्षक यांचेमार्फत करणेत येते.
 • तसेच प्रत्यक्ष जागा पाहणी करण्यात येते.
 • प्रकरणात तांत्रिक, प्रशासकिय, कागदपत्रांची पूर्तता (असल्यास) पूर्ण झाल्यावर बांधकामांच्या बांधकाम प्रकरणानुसार संबंधित उप अभियंता/कार्यकारी अभियंता यांचेकडे मान्यतेसाठी सादरकरण्यात येते.
 • विशिष्ट बांधकाम प्रस्ताव जसे पेट्रोल पंप, आर-7 अंतर्गत प्रस्ताव, झोन बदल इ. स्वरूपाची प्रकरणे मा.महापालिका आयुक्त स्तरावर मंजूर करण्यात येतात.
 • प्रस्ताव मान्य झाल्यावर आवश्यक विकास व इतर शुल्क चे चलन महानगरपालिकेच्या कोषागरात भरण्यात येते.
 • सदर शुल्क भरल्यावर बांधकाम परवानगी दाखला (कमेन्समेंट सर्टिफिकेट) व नकाशे संबंधित झोन मार्फत देण्यात येतात.
 • By | 2017-05-07T03:46:48+00:00 May 5th, 2017|0 Comments

  About the Author:

  Leave A Comment