पुणे महानगरपालिकेने नागरिकांची सनद तयार केली आहे का?
होय, शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अघिनियम 2005 मधील कलम ८ नुसार पुणे महानगरपालिकेने सन २०१० मध्ये नागरिकांची सनद तयार करून ती कार्यान्वित केली आहे. सन 2011 मध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात झालेल्या सुधारणेनुसार या अधिनियमाच्या कलम 72 मध्येही नागरिकांच्या सनदेबाबत तरतूद करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या www.punecorporation.org या संकेतस्थळावर व मनपाच्या माहिती अधिकार ग्रंथालया [...]